Home Breaking News बेभान पोलीसांवर कारवाईचा धडाका

बेभान पोलीसांवर कारवाईचा धडाका

● आतापर्यंत चौघे निलंबीत पुढचा नंबर कोणाचा ?

C1 20250205 17043682
आतापर्यंत चौघे निलंबीत पुढचा नंबर कोणाचा ?

Police News | वणी पोलीस ठाण्‍यातील पोलीस कर्मचारी सुसाट व सैराट झाल्‍याचे आतापर्यत दिसुन आले. विविध प्रकरणे अंगलट आल्‍याने ठाणेदारांची तडकाफडकी उचलबांगडी करण्‍यात आली. माञ ठाणेदारांच्‍या अधिनस्त कर्मचारी अद्याप बेभान वागताहेत. मागील काही महिन्यात वणी पोलीस ठाण्‍यातील चार पोलीस कर्मचारी निलंबीत झाले आहे तर पुढचा नंबर कोणाचा ? हे बघणे औत्‍सूक्‍याचे आहे. Four policemen have been suspended, so whose number is next ?

मावळत्‍या ठाणेदाराची गोवंश कत्तल प्रकरणी तडकाफडकी उचलबांगडी करण्‍यात आली. तर वणी पोलीस ठाण्‍याचा कारभार पोलीस निरिक्षक गोपाल उंबरकर यांना सोपविण्‍यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यात समन्‍वय ठेवण्‍याचे आव्‍हान असले तरी बेभान वागणाऱ्या पोलीसांवर करडी नजर ठेवावी लागणार आहे. सोबतच शहरातील अवैध धंद्याचे समुळ उच्‍चाटन करण्‍याची जबाबदारी ठाणेदारांवर आपसुकच येवून ठेपली आहे.

वणी पोलीस ठाण्‍यातील दोन पोलीस कर्मचारी मटका लागवडीतील आर्थिक व्‍यवहाराची वाच्‍यता झाल्‍याने निलंबीत झाले तर एक ASI महिला कर्मचारी ऑनलाईन रक्‍कम स्विकारल्‍याने निलंबीत झाली होती. नुकतेच गुलाबी नशेत मद्यधुंद अवस्‍थेत पडलेल्या व्‍यसनी पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधिक्षकांनी तडकाफडकी निलंबीत करुन बेभान वागणाऱ्या पोलीसांवर वचक बसवला आहे.

Img 20250103 Wa0009

धमकी दिल्यानेच “ललित” चा मृत्यू…!

शिवसेनेचे शहर प्रमुख ललित लांजेवार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याला डीबी पथकातील विकास धडसे यांनी अट्रोसिटी मध्ये अडकवतो अशी धमकी दिल्यामुळे तणावात असलेल्या “ललित” चा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप मृतकाची पत्नी श्रीरंगी ललित लांजेवार यांनी केला. या प्रकारामुळे धडसे वादात अडकले आहेत.

शेतकऱ्याला मारहाण PSI गोत्यात

कुक्कुटपालनासाठी कोंबडा व कोंबड्या विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस उप निरीक्षक गुल्हाने यांनी मारहाण केल्याचा आरोप सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांनी केला. याबाबत चे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पालकमंत्री संजय राठोड यांना पाठविण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांचेवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
Rokhthok News

Previous articleट्रकने दुचाकीला उडवले, तरुण ठार
Next articleखा. प्रतिभा धानोरकर यांना पितृशोक
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.