Home Breaking News आरक्षण सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष, सोमवारी फैसला

आरक्षण सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष, सोमवारी फैसला

491
C1 20241123 15111901

निवडणुकीच्या रणसंग्रामाचे बिगुल वाजले

वणी: पालिका निवडणुकीची धामधूम लवकरच सुरू होणार आहे. आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने गुढघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. सोमवार दि.13 जूनला मुख्यधिकारी सोडत काढणार आहे.

एप्रिल 20 ते मार्च 22 या कालावधीत मुदत संपलेल्या व नवनिर्मित नगरपालिका सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याकरीता 10 जून ला जिल्हाधिकारी यांनी सदस्यपदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध केली आहे.

बुधवार दि 15 जूनला आरक्षणाची अधिसूचना राहिवाश्यांच्या माहिती व हरकती तसेच सूचना मागविण्यासाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागणार आहे. हरकती मागविण्याचा कालावधी मंगळवार दि. 21 जून पर्यंत असणार आहे.

आरक्षण सोडतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांचेकडे दि. 24 जून पर्यंत पाठविण्यात येणार आहे. तर बुधवार दि. 29 जून पर्यंत विभागीय आयुक्त पालिका सदस्यपदाच्या अरक्षणास मान्यता देतील. तसेच 1 जुलै ला अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नगर पालिकेची मुदत संपून बराच कालावधी लोटला आहे. अनेकांनी आपापल्या वार्डात तसेच प्रभागात सामाजिक कामाचा, तक्रारी आणि निवेदनाचा सपाटा लावला होता. भावी नगरसेवकांचे स्वप्न रंगविणाऱ्यानी राजकीय फिल्डिंग सुद्धा लावली होती. आता त्या सर्व हवश्या, गवश्या नवश्याचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
वणी: बातमीदार