● रंगनाथ नगर परिसरातील घटना
वणी | रंगनाथ नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय तरुणाने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवार दि. 10 ऑगस्ट ला सकाळी उजागर झाली.

दादाजी इस्त्री झाडे (30) असे मृतकाचे नाव असून तो रंगनाथ नगर परिसरात वास्तव्यास होता. रोजमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा तो हाकत होता. बुधवारी सकाळी तो घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
कुटुंबातील व्यक्तींनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाने आत्महत्या नेमकी का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह परिवाराला सोपविण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
वणी: बातमीदार