Home क्राईम उप विभागात तंबाखू तस्करीचा ‘नंगा नाच’

उप विभागात तंबाखू तस्करीचा ‘नंगा नाच’

● प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तस्कर सैराट

C1 20251227

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तस्कर सैराट

Crime News :
राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखूवर कडक बंदी असतानाही वणी उप विभागात गुटखा तस्करीचा ‘नंगा नाच’ सुरू आहे. परराज्यातून येणारा गुटखा अधूनमधून पोलिस कारवायांत जप्त होतो. काही किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. मोठे मासे गळाला लागत नाही किंबहुना त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. Gutkha smuggling ‘nanga naach’ in the area

अनेकदा पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी “दीपक चावला” या तंबाखू तस्करावर विविध कलमान्वये गुन्हेही दाखल झाले होते. आता त्याला प्रतिबंधित गुटखा व सुगंधीत तंबाखू तस्करीचा “अनभिषिक्त सम्राट” म्हणून ओळखल्या जाते. सध्यस्थीतीत उपविभागात प्रतिबंधित तंबाखू तस्करीचा नंगा नाच प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असल्याचे चित्र आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वणी उपविभागातील गुटखा तस्करीतून दररोज सुमारे 10 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. महिन्याला हा काळा बाजार कोट्यवधींच्या घरात जातो. या प्रचंड आर्थिक उलाढालीच्या तुलनेत होणाऱ्या कारवाया अत्यंत तोकड्या असल्याने, हा गोरखधंदा दिवसेंदिवस अधिकच फोफावत चालल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

Img 20250103 Wa0009

संघटित स्वरूपात चालणारी गुटखा तस्करी, मोठ्या प्रमाणावरील साठवणूक, परराज्यातून येणारा प्रतिबंधित तंबाखू आणि अल्पवयीन व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, या गुन्ह्यांकडे ‘सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर अपराध’ म्हणून संबंधित विभाग लक्ष देत नाही. यामुळेच प्रतिबंधित तंबाखूचे तस्कर “सैराट” झाले आहे.

भारतीय न्याय संहितेतील मानवी जीवन व आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांशी संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत भेसळ, अपायकारक अन्नपदार्थांचे उत्पादन व वितरण यासंबंधीची गंभीर कलमे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावल्यास प्रतिबंधित गुटखा व सुगंधीत तंबाखू तस्करीला निश्चितच आळा बसणार आहे.

या सगळ्या प्रकारामागे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिस प्रशासनातील काही घटकांशी असलेले अर्थपूर्ण संबंध कारणीभूत तर नाहीत ना, असा संशय स्थानिक नागरिक उघडपणे व्यक्त करीत आहेत. “मग बंदी नेमकी कुणासाठी?” असा सवाल उपस्थित होत असताना, केवळ दिखाऊ कारवाया नव्हे तर मुळावर घाव घालणारी कठोर आणि पारदर्शक कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Rokhthok