Home Breaking News शाळा स्थलांतराला विद्यार्थ्यांसह पालकांचा विरोध

शाळा स्थलांतराला विद्यार्थ्यांसह पालकांचा विरोध

445

विद्यार्थ्यांनी काढला मूक मोर्चा

वणी | वेस्टन कोल फील्ड लिमिटेड कडून तालुक्यातील सुंदरनगर येथे DAV स्कूल चालविल्या जाते ही शाळा घुग्गुस येथे स्थलांतरित करण्याचा घाट वेकोली प्रशासनाने घातला आहे. याला आता विद्यार्थ्यांसह पालकांनी तीव्र विरोध दर्शविला असून दि 24 ऑगस्टला शहरात विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Img 20250422 wa0027

कोळसा खाण बाधित व प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या करिता वेकोली प्रशासना कडून इंग्रजी माध्यमाची DAV स्कूल गेल्या अनेक वर्षांपासून सुंदरनगर वेकोली वसाहत येथे सुरू आहे.

Img 20250103 Wa0009

या शाळेत परिसरातील गाव खेड्यापासून ते वणी शहरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणा करिता जातात. शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने अनेक पालकांचा ओढा या शाळेकडे दिसून येत आहे. मात्र कोळसा खाणीचा विस्तार करावयाचा असल्याने शाळेच्या लगतच ब्लास्टींग केल्या जात आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीला हादरे बसत असल्याने वेकोली प्रशासनाने ही शाळा घुग्गुस येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाला पालक वर्गातून प्रचंड विरोध होतांना दिसत आहे. शाळा घुग्गुस येथे गेल्यास विध्यार्थ्यांना जास्त अंतर प्रवास करावा लागणार आहे. प्रदूषण ग्रस्त असलेल्या गावात शाळा गेल्यास विध्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सदर शाळा भालर वसाहतीतच स्थलांतरित करण्याची मागणी पालक वर्गा कडून होत आहे. मात्र वेकोली प्रशासन घुगूस येथे स्थलांतरावर ठाम असल्याने दि 24 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांनी हातात सेव DAV असे फलक घेऊन शहरातून मूक मोर्चा काढला व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आता यावर वेकोली प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार