वणी : आंबेडकर चौक परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय युवकाने वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर गळफास घेतला. ही घटना बुधवार दि. 31 ऑगस्टला सकाळी घडली आहे.

तेजस मोगरे (20) असे मृतक युवकाचे नाव आहे. तो आंबेडकर चौक परिसरात राहतो. सकाळी तो आपल्या दुचाकीने वर्धा नदीवरील पुलावर पोहचला व दुचाकी उभी करून त्याने पुलाच्या गजाला बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतला.
त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.
वणी: बातमीदार