Home Breaking News चक्क…मुख्यालयाजवळच पोलीस कर्मचाऱ्याची ‘हत्या’

चक्क…मुख्यालयाजवळच पोलीस कर्मचाऱ्याची ‘हत्या’

● यवतमाळ येथे घडलेल्या घटनेने खळबळ

यवतमाळ | जुन्या वादातून दोन युवकांनी चक्क… मुख्यालयाच्या गेट जवळ पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केली. बुधवार दि. 14 सप्टेंबर ला रात्री ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली असून पोलीसच सुरक्षित नसल्याचे वास्तव उजागर झाले आहे.

निशांत खडसे असे त्या दुर्दैवी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तो अकोला येथील निवासी असून सध्या यवतमाळ मुख्यालयात बॅड पथकात कार्यरत होता. बुधवारी रात्री तो कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे गेला होता. याचवेळी त्याचेवर लोखंडी राॅडने हल्ला चढविण्यात आला.

पोलिस मुख्यालय गेट जवळ मृतकाच्या मित्रांनीच जबर हल्ला चढवला, घाव वर्मी लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
यवतमाळ: बातमीदार

Img 20250103 Wa0009