Home Breaking News गळफास लावून कामगाराची आत्महत्या

गळफास लावून कामगाराची आत्महत्या

● MIDC परिसरातील घटना

C1 20250616 18435026

MIDC परिसरातील घटना

Sad News :
एमआयडीसी परिसरात मोकळ्या मैदानातील झाडाला गळफास लावून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी 4 वाजता उघडकीस आली. वामन दिगांबर बुरचुंडे (42) असे मृतकाचे नाव असून तो गवंडी कामगार होता. Worker commits suicide by hanging

वामन बुरचुंडे हे आपल्या कुटुंबासह लालगुडा (जुना) येथे वास्तव्यास होते. गवंडी काम करून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. आर्थिक चणचण असल्याने काही काळापासून ते नैराश्यग्रस्त होते, असे बोलल्या जाते.

C1 20260430

माजी आमदारांचे “फॉरचूनर” वाहन फोडले

सोमवारी दुपारी एमआयडीसी परिसरातील क्वॉटर जवळील झाडाला त्यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही बाब प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामिण रुग्णालयात पाठवला.

Img 20250103 Wa0009

वामन बुरचुंडे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वणी पोलिस पुढील तपास करत आहे.
Rokhthok News

Previous articleमाजी आमदारांचे “फॉरचूनर” वाहन फोडले
Next articleत्या… तिघांवर बुधवारी अंत्यसंस्कार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.