वणी | वणीचे ग्रामदैवत असणाऱ्या जैताई मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवात वणीच्या मित्र मंडळ संस्थेद्वारे प्रतिवर्षीप्रमाणे अष्टमीच्या पावन पर्वावर जगदंबा स्तोत्राचे पठण आयोजित करण्यात आले होते.

सुधीर दामले आणि प्रा. डॉ. अभिजित अणे यांच्या सौजन्याने आकर्षक छापील स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या महालक्ष्मी स्तोत्राचे भारती सरपटवार, प्रणिता पुंड, संध्या अवताडे, कल्पना देशपांडे, अपर्णा देशपांडे, निमा जिवने, कामिनी हूड, मृदुला झिलपिलवार, शीतल नारलावार, अर्चना उपाध्ये, वृषाली देशमुख, स्नेहलता चुंबळे, सीमा कावडे, सुमन जैन, अरुणा उत्तरवार आणि शीतल वटे यांनी नऊ वेळा पारायण केले.
याप्रसंगी संवादिनीवर दादाराव नागतुरे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जैताई देवस्थानचे सचिव आणि मित्र मंडळाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी तर आभार प्रदर्शन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर दामले अभिजित अणे यांसह मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
वणी : बातमीदार