Home Breaking News आणि….”कटर” लागला पोलीसांच्‍या हाती

आणि….”कटर” लागला पोलीसांच्‍या हाती

1458

अनेक गुन्ह्याचा लागणार छडा

वणी | पोलीस दप्‍तरी कुख्‍यात म्‍हणुन ओळखल्‍या जात असलेला सराईत चोरटा “कटर” महत्‍प्रयासाने वणी पोलीसांच्‍या हाती लागला. ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक डीबी पथकाने सोमवार दि. 3 ऑक्‍टोबरला सायंकाळी घुग्‍गूस येथील शिवाजी चौकातुन त्याला ताब्यात घेतले.

Img 20250422 wa0027

राजु उर्फ कटर पुरुषोत्‍तम पोटे (40) असे अटकेतील अट्टल चोरटयांचे नांव आहे. त्‍याचेवर मागील काही दिवसांपासुन पाळत ठेवण्‍यात आली होती. तीन दिवसांपुर्वी तो वागदरा येथे असल्‍याची टिप पोलीसांना मिळाली होती. माञ पोलीस आल्‍याची चाहुल लागताच तो भिंतीवरुन उडी मारुन पसार झाला होता.

Img 20250103 Wa0009

वणी शहरात चोरीच्‍या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. दिवसाढवळया चोरटे आपले इस्‍पीत साध्‍य करतांना दिसत आहे. तर बाजारपेठेतील सुविधा कापड केंद्रात चोरटयांनी गल्‍यातील 8 लाख रुपयांची रोकड लंपास करुन दुकानच पेटवून दिल्‍याची घटना घडल्‍याने पोलीसांच्‍या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केल्‍या जात होते.

‘कटर’ उर्फ राजु हा कुख्यात गुन्‍हेगार आहे त्‍याचेवर अनेक गुन्‍हयांची नोंद आहे. अतिशय धाडसी असल्‍याची त्‍याची ख्‍याती असुन पोलीसांना गुगांरा देण्‍यात तो पटाईत आहे. वणी शहर व परिसरात त्‍याचा वावर असल्‍याची माहिती पोलीसांना मिळाली होती यावरुन त्‍याच्‍या हालचालीवर लक्ष ठेवण्‍यासाठी गोपनिय माहितगार तैनात ठेवले होते.

‘कटर’ला पकडण्‍यात पोलीसांना यश आल्‍याने अनेक गुन्ह्याचा छडा लागणार आहे. सदर कारवाई ठाणेदार रामक्रष्‍ण महल्‍ले यांचे मार्गदर्शनाखाली सपोउनि डोमाजी भादीकर, विठठल बुरुजवाडे, हरिंद्र भारती, सचिन मडकाम, सागर सिडाम यांनी केली.
वणी: बातमीदार