Home Breaking News मनसेची महत्वाकांक्षी योजना….राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजनेची पहिली यादी जाहीर

मनसेची महत्वाकांक्षी योजना….राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजनेची पहिली यादी जाहीर

अल्पभू-धारक शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत
मशागत ते पीक निघेपर्यंत अर्थसाहाय्य

सुनील पाटील | नैसर्गिक आपत्तीमुळे वणी उप विभागात हाहाकार माजला होता. शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. शेत पिकांच्या उत्पादनाची आशा मावळली, उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. अशातच ‘आम्ही आहोत ना…’ असे म्हणत मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर पुढे सरसावले आणि अल्पभू-धारकांसाठी “सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना” अमलात आणली. याच महत्वाकांक्षी योजनेची पहिली यादी दि. 16 ऑक्टोबर ला जाहीर होत आहे.

विदर्भात पावसाने चांगलाच धुमकूळ घातला होता. त्यातल्या त्यात वणी विधानसभा क्षेत्रात ढगफुटी चा प्रत्यय आला. त्यातच धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदी, नाल्यानी विक्राळ रूप धारण केले आणि अनेक गावांत पाणी शिरले, हजारो हेक्टर शेती खरडून गेली. शेतकरी उध्वस्त झाला, जनजीवन विस्कळीत झाले होते.

पूर पीडितांच्या मदतीला मनसे सरसावली पूरग्रस्त शेतकऱ्यांना आपत्तीतुन सावरण्यासाठी मनसे अक्षरशः धावून गेली. अन्न धान्याच्या किटसह मूलभूत वस्तूंचा पुरवठा करण्यात आला तर पशुधनाची काळजी घेत चारा छावण्या उभारून शेतकऱ्यांसोबतच मुक्या जनावरांची काळजी घेतली होती.

Img 20250103 Wa0009

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकरांनी “सरकार नाही म्हणून काय झाले? आम्ही आहोत ना…” म्हणत मदतीचा सपाटा पहिल्या दिवसापासून सुरू केला होता. वणी व मारेगाव तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली होती, हजारो नागरिकांना रब्बी हंगामात स्वतः च्या पायावर उभे राहता यावे यासाठी “सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजनेची” मुहूर्तमेढ रोवली.

मनसेच्या या महत्वाकांक्षी योजनेची पहिली यादी आज रविवारी जाहीर करण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेमुळे रब्बी हंगामात आपले स्वप्न पूर्ण करता येणार असून. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाची दखल राज्य सरकारने घेऊन बळीराजाला आर्थिक सशक्त करावे अशी मागणी होत आहे.
वणी: बातमीदार