Home Breaking News काट्याची लढत की सहज सोपा विजय

काट्याची लढत की सहज सोपा विजय

वसंत जिनिंगची निवडणूक चुरशीची

रोखठोक | सहकार क्षेत्रातील त्यातच शेतकरी हिताच्या संस्थेतील निवडणुका सातत्याने तुल्यबळ होतात. येथील वसंत जिनिंगच्या निवडणुकीत चार पॅनलचे 63 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बलाढ्य नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने काट्याची लढत की सहज सोपा विजय हे बघणे औत्सुक्याचे ठरणार असले तरी वसंत जिनिंगची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

वणी मतदारसंघातील सहकार क्षेत्रात झपाट्याने नावारूपाला आलेल्या वसंत जिनिंगची निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. मावळते अध्यक्ष, आजी- माजी आमदार व चौथा गट असे चार पॅनलचे 63 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. प्रत्येक गट आपापल्यापरीने प्रचार यंत्रणा राबवत असले तरी जय सहकार ने मात्र सभासदांच्या गाठीभेटीवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केले आहे.

वसंत जिनिंगच्या भरभराटीसाठी कटिबद्ध असल्याचे व आजपर्यंत केलेल्या विकासाचा आलेख सभासदांच्या निदर्शनास आणण्याचे काम जय सहकार पॅनलचे उमेदवार करताहेत. त्यातच सहकार क्षेत्रात वावरतांना ऍड. देविदास काळे यांनी ताब्यातील संस्थांचा केलेला कायापालट अधोरेखित केल्याजात आहे.

Img 20250103 Wa0009

अवघ्या काही महिन्यांपूर्वी येथील प्रतिथयश पतसंस्थेची निवडणूक पारपडली. त्यावेळी सुद्धा विरोधकांनी एकजूट करत ऍड. काळे यांना थोपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नियोजनबद्ध रणनीती, सभासदांसोबत असलेला स्नेह आणि सर्वश्रुत असलेली संस्थेची प्रगती यामुळे एकहाती सत्तास्थापन करण्यात यश आले होते.

वसंत जिनिंगच्या निवडणुकीत चार पॅनल एकमेकांना तुल्यबळ लढत देणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काट्याची लढत की सहज सोपा विजय, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जय सहकार ची प्रचार यंत्रणा, स्वतः उमेदवार, सभासदांसोबत संवाद साधत आहे. यामुळे जय सहकारचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
वणी : बातमीदार