Home क्राईम अवघ्या दोन तासात चोरट्याचा छडा

अवघ्या दोन तासात चोरट्याचा छडा

● साडेसात तोळे सोन्याचा ऐवज हस्तगत

C1 20250531 15533396

साडेसात तोळे सोन्याचा ऐवज हस्तगत

Crime News :
शहरातील मिर्झा वॉशिंग सेंटर (गॅरेज) येथे फोर व्हीलर दुरुस्तीसाठी आणलेल्या वाहनाच्या डिक्कीतून सुमारे साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करताच DB पथकाने अवघ्या दोन तासात चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. The DB team caught the thief in just two hours.

रवींद्र रामदास राजूरकर रा. मोहदा यांनी आपले चारचाकी वाहन दुरुस्तीसाठी आणले होते. चोरट्याने संधी साधत गाडीच्या डिक्कीतून तीन तोळ्याची प्रत्येकी एक अशा दोन सोन्याच्या बांगड्या आणि दीड तोळ्याचा चपला कंठी हार असा एकूण साडेसात तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला.

C1 20260430

याप्रकरणी राजूरकर यांनी थेट पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार केली. ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत DB पथकाला तपासकामी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील संशयितांवर लक्ष केंद्रित केले.

Img 20250103 Wa0009

संकलित माहितीच्या आधारे रंगनाथ नगर, वणी येथील शेख तनवीर शेख अजिज (20) या युवकास ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी हिसका दाखवताच अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने चोरी केलेले दागिने लपवून ठेवलेल्या ठिकाणी नेले. पोलिसांनी तेथून सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यांची एकूण किंमत अंदाजे सात लाख रुपये आहे.

सदर कारवाई SDPO गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि धीरज गुल्हाने व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी गणेश, नंदकुमार, मुनेश्वर व गजानन यांनी केली.
ROKHTHOK NEWS