Home Breaking News पत्रकार तथा वंचितचे दिलीप भोयर ‘बेपत्ता’

पत्रकार तथा वंचितचे दिलीप भोयर ‘बेपत्ता’

6415

पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटवल्याने व्यथित

रोखठोक |: शासकीय जागेवरील अतिक्रमित झेरॉक्स सेंटर कोणतीही पूर्वसूचना न देता काढल्याने व्यथित झालेल्या दिलीप भोयर यांनी “भावांनो मी खचलो, मला माफ करा…ही माझी शेवटची पोस्ट आहे” असे आपल्या फेसबुक वॉल वर पोस्ट व्हायरल केल्याने चांगलीच खळबळ माजली. तर पंढरपूर येथून वणी ला परतताना नांदेड रेल्वे स्टेशन वरून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसात केली आहे.

Img 20250422 wa0027

पत्रकार तसेच वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे कमालीचे आक्रमक आहेत. पत्रकारितेसोबतच राजकारणात त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेनेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत. तर यवतमाळ जिल्हा दारूबंदी करिता पुढाकार सुद्धा घेतला होता.

Img 20250103 Wa0009

आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा याकरिता त्यांनी पंचायत समितीच्या शासकीय जागेवर झेरॉक्स सेंटर व शेतकरी सहाय्यता कक्ष स्थापन केला होता. झेरॉक्स च्या माध्यमातून परिवाराचा गाडा हकण्यात येत होता तर दिन दुबळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच निराधाराना आधार देण्याचे काम भोयर निस्वार्थपणे करत होते.

शुक्रवारी नगरपालिका, महसूल व पंचायत समिती प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढले यात भोयर यांचे दुकान सुद्धा काढण्यात आले. तर भोयर आपल्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथे गेले होते. त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली अचानक होत्याचं नव्हतं झाल्याने ते कमालीचे व्यथित झाले.

भोयर यांनी घटनेच्या दिवशी फेसबुक वरून अनेक पोस्ट केल्यात. तर सायंकाळी केलेली पोस्ट भावनिक तसेच हदरावणारी होती. “भावांनो मी खचलो मला माफ करा ही माझी शेवटची पोस्ट आहे” माझ्या गैरहजेरीत बीडीओ, तहसीलदार आणि सी.ओ ने माझा व्यवसाय झेराक्स सेंटर मला कोणतीही पूर्वसूचना न देता बळजबरीने जेसीबी लावून तोडफोड केली त्यामुळे माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट केले.

भोयर यांच्या पत्नी सुकेशनी भोयर यांनी वणी पोलिसात पती दिलीप रामदास भोयर बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे. तसेच त्यांचे भ्रमणध्वनी बंद असून नास्ता आणतो म्हणत नांदेड स्टेशन वर उतरले ते रेल्वेत चढलेच नाही असे नमूद केले आहे. भोयर हे नेमके कुठे गेले हे कळायला मार्ग नसून त्यांचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.
वणी : बातमीदार