● पक्षश्रेष्ठींचा निर्णय
तुषार अतकारे | वसंत जिनिग अँड प्रेसिंगच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर एकदाचं ठरलं..! अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली आहे.
वसंत जिनिंग अँड प्रेसिंग ची निवडणूक अटीतटीची झाली होती. तिहेरी झालेल्या या लढतीत माजी आमदार वामनराव कासावर यांच्या परिवर्तन पँनलने शेवटच्या क्षणी बाजी मारली आणि 17 पैकी 15 उमेदवार निवडून आणले होते व आपले वर्चस्व सिध्द केले.
● झरी तालुक्याला प्राधान्य ●
वसंत जिनिंग ची निवडणूक अतिशय रंगतदार व अटीतटीची झाली. तीन बलाढ्य नेत्यांनी आपल्या पॅनलच्या माध्यमातून तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. मतमोजणीच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष व त्यांचे पॅनल आघाडीवर होते मात्र अखेरच्या क्षणी झरी तालुक्याने माजी आमदार वामनराव कासावार यांना विजयश्री मिळवून दिली. यामुळेच झरी तालुक्याला वसंत जिनिंगचे प्रतिनिधित्व दिल्याचे बोलल्या जात आहे.
या निवडणुकीत काँगेस पक्षाचे धुरंधर नेते निवडून आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची याचा पेच पक्षश्रेष्ठींना पडला होता. प्रमोद वासेकर, संजय खाडे व पुरुषोत्तम आवारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती मात्र पक्षश्रेष्ठींच्या मनात काही वेगळच होतं.
मंगळवारी अध्यक्षाची निवड प्रक्रिया होणार होती त्यापूर्वी सर्व संचालकांची वामनराव कासावर यांनी बैठक घेतली. या बैठकीत आशिष खुलसंगे यांचे नाव अध्यक्षपदा करिता ठरविण्यात आले. तर उपाध्यक्ष पदी जय आबड यांची वर्णी लागणार असून कार्यकारी संचालक पदी प्राध्यापक शंकर वऱ्हाटे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार