Home Breaking News आणि ….शिवसेनेच्या शिंदे गटाने खाते उघडले

आणि ….शिवसेनेच्या शिंदे गटाने खाते उघडले

1930

खाडे च्या नेतृत्वात सरपंच व चार सदस्य विजयी

रोखठोक | वणी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी अतिशय चुरशीच्या झाल्या. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी शिवसेनेच्या शिंदे गटाने सरपंच व चार सदस्य निवडून आणत आपले अस्तित्व सिद्ध केले.

Img 20250422 wa0027

माजी पंचायत समिती सदस्य टीकाराम खाडे यांच्या पंचायत समिती गणातील दोन ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत्या. यात केसुरली व मंदर येथे खाडे यांनी निवडणुकीची रणनिती आखली होती. मतमोजणीअंती मंदर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली तर केसुरली येथे खाडे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व चार सदस्य निवडून आले आहेत.

Img 20250103 Wa0009

वणी तालुक्यात भाजपचा वरचष्मा राहिला आहे. दुसऱ्यास्थानी शिवसेना ( ठाकरे गट ) यांनी बाजी मारली. तर केसुरली येथे सरपंच म्हणून निवडून आलेले मंगेश काकडे हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे असल्याचे स्पष्ट करत आहे. तर सदस्य म्हणून प्रणय निब्रड, अनंत कोसारकर,अश्विनी टोंगे व माधुरी दुर्गे हे सर्व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचेच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

एकूणच दावे प्रतिदावे होत असले तरी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपा उमेदवारांनी चांगलीच आघाडी घेतली. त्या पाठोपाठ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी आपला गढ कायम राखत कुरई व कळमना येथे भगवा फडकवला आहे मात्र वेळाबाई येथील शिवसेनेची पंचेंवीस वर्षाची सत्ता भाजपने बळकावली आहे.
वणी : बातमीदार