Home Breaking News पुन्हा थरार…. वाघाचा वेकोली कर्मचाऱ्यावर हल्ला

पुन्हा थरार…. वाघाचा वेकोली कर्मचाऱ्यावर हल्ला

3115

निलजई कोळसा खाणीतील घटना

रोखठोक| वणी परिसरात आतंक माजवणारा नरभक्षक वाघ प्रशासनाने जेरबंद केला होता. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा वाघ एक्शन मोड मध्ये आला असून मंगळवारी सायंकाळी निलजई कोळसा खाणीतील डंपर पार्किंग क्षेत्रात बसलेल्या 57 वर्षीय वेकोली कर्मचाऱ्यांवर पाठीमागून हल्ला केला. ते गंभीर जखमी असून चंद्रपूर येथे त्यांचेवर उपचार सुरू आहे.

Img 20250422 wa0027

वणी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. दोघांचा बळी व एकाला जखमी करणाऱ्या त्या नरभक्षक वाघ की वाघीण त्याला वन विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर वाघांचे हल्ले काही प्रमाणात मंदावले असताना चक्क वेकोलीच्या अधिनस्त क्षेत्रात वाघाने हल्ला केल्याने पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Img 20250103 Wa0009

वेकोली च्या निलजई कोळसा खाणीतील डंपर पार्किंग क्षेत्रात तिघे कामगार बसलेले असताना अचानक वाघाने पाठीमागून केशव नांदे (57) रा. वणी यांचेवर हल्ला केला. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे सहकारी प्रचंड दहशतीत आले. जखमी नांदे यांनी घुग्गुस येथील राजीव रतन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
वणी : बातमीदार