Home Breaking News पिकअप व ऑटोची धडक, एक ठार

पिकअप व ऑटोची धडक, एक ठार

झरपट शिवारातील घटना

रोखठोक | यवतमाळ महामार्गावर अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. झरपट शिवारात ऑटो व पिकअप ची समोरासमोर जबर धडक झाली यात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. 30 डिसेंबरला 12 वाजताच्या दरम्यान घडली.

रामचंद्र बापुराव जगताप (65) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते वरुड येथील निवासी होते. मागील दोन दिवसांपासून या मार्गावर सातत्याने अपघात घडताहेत. वाहन चालक भरधाव वाहने हाकत असल्याने होणाऱ्या अपघातात नाहक बळी जाताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009