● संभवनाथ जैन मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
रोखठोक | जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचे 2621 व्या जन्म कल्याणक महोत्सव (महावीर जयंती) निम्मीत वणी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने महावीर स्वामीच्या प्रतिमेची शहरातून काढण्यात आलेल्या भव्यशोभा यात्रेने वणीकरांचे लक्ष वेधले. The grand procession of Mahavir Swami’s image from the city on behalf of the entire Jain community attracted the attention of the Wanikars.
जैन समाजातील हजारो स्त्री, पुरुष, बालक या शोभायात्रे मध्ये पारंपरिक परिधान धारण करून व महावीर स्वामी यांचा जयजयकार, जैन धर्म की जय अशी घोषणा देत सहभागी झाले होते. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त मंगळवारी सकाळी 7.30 वाजता येथील जैन स्थानकमध्ये नवकारमंत्र जापचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर आचार्य श्री महाश्रमणजी म.सा. यांचे सुशिष्य आलोक मुनिजी म.सा., हिम मुनिजी म.सा. व लक्ष्य मुनीजी म.सा. यांचे प्रवचन व मंगलपाठ झाले. तत्पश्चात संभवनाथ जैन मंदिरात विविध बोली व धार्मिक कार्यक्रम व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
संभवनाथ जैन मंदिरातून निघून जटाशंकर चौक, गांधी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक, खाती चौक ते परत जैन मंदिरात शोभायात्रेचे समापन करण्यात आले. दरम्यान शोभायात्रा खातीचौक येथे पोहचली असता पूज्य आलोक मुनिजी म.सा. यांनी मांगलिक वाचन केले. शोभायात्रेनंतर येथील महावीर भवनमध्ये गौतमप्रसादी (स्वरुचि भोज) चे आयोजन करण्यात आले होते.
वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघचे अध्यक्ष चंद्रकुमार चोरडिया, जैन श्वेतांबर तेरापंथ सभा अध्यक्ष सुभाष गेलडा, श्री संभवनाथ जैन मंदिर अध्यक्ष राजेंद्र मेहता व दिगंबर जैन समाज अध्यक्ष चुंबलेसर यांच्या मार्गदर्शनात महावीर जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
शोभायात्रे दरम्यान वाहतुकीस व्यवधान उत्पन्न होणार नाही यासाठी येथील पोलिस विभागाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम शांततेने व अनुशासनसह पार पाडण्यासाठी जैन नवयुवक मंडलच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार