● न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांची कारवाई
रोखठोक | शिरपूर पोलीस स्टेशनच्या अधिनस्त दारूबंदीच्या 178 गुन्ह्यातील देशी विदेशी दारू न्यायालयाच्या आदेशाने नष्ठ करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,वणी यांनी उत्पादन शुल्क विभाग यांचे समक्ष नष्ट करणे बाबत परवानगी दिली होती. त्यानुसार गुरुवार दि. 27 एप्रिलला 16 हजार 440 दारू बॉटल वर “रोड रोलर” फिरवण्यात आला. Under Shirpur Police Station, the domestic and foreign liquor in 178 cases of liquor ban was destroyed by the order of the court.
या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांनी पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे सोबत पत्र व्यवहार केला. सदर गुन्ह्यातील दारू नाश करून खाली बॉटल लिलाव करावी व रोख रक्कम चलनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या सरकारी खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शिरपूर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व दोन पंच यांचे समक्ष रीतसर पंचनामा करून 178 गुन्ह्यातील एकूण 16 हजार 440 देशी-विदेशी दारूच्या काचेच्या बॉटल मधील दारू खड्डयात नाश केली तर रिकाम्या प्लास्टिक बॉटलचा लिलाव करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड (Dr Pawan Bansod) , अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (Piyush Jagtap) तसेच SDPO संजय पुजलवार (Sanjay Pujalwar) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एन. के. सुर्वे (N.K. Surve), सतीश घाडगे (Satish Ghadage) आणि पंच यांचे समक्ष कारवाई करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार