● राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदक
Skating championship news : बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात असे म्हटल्या जाते, बालपणांपासुन असलेले अंगजात गुण पालकांनी ओळखल्यास कोणत्याही क्षेञात भरारी घेता येते. येथील पोलीस अधिकारी माधव शिंदे यांची यांची लेक ‘सानवी’ हिने 9 वर्षाच्या आतील गटात छञपती संभाजी महाराज नगर येथे 1 ते 3 जुन दरम्यान पार पडलेल्या ऑल इंडीया रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत 2 सुवर्णपदक तर एक रजत पदक जिंकत राज्याचे नाव उंचावले आहे.The state has won 2 gold medals in the All India Roller Relay Skating Competition.
छञपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्केटिंगपटूंचा बोलबाला राहिला आहे. रिले स्पर्धेत “सानवी माधव शिंदे ” हिने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत 2 सुवर्णपदक जिंकून शानदार “गोल्डन गर्ल”चा किताब पटकावला आहे.
सानवी माधव शिंदे हि पोद्दार इंटरनॅशनल स्कुल ची दुसऱ्या वर्गातील विदयार्थीनी आहे. तिने A to Z अकादमी मधुन प्रशिक्षण घेतलेले आहे. तिच्यातील कलांगुणांना वावा मिळावा म्हणुन कोच नाझीया इम्रान मिर्झा (Naziya Imran Mraza )यांनी विषेश परिश्रम घेतले आहे.
ऑल इंडीया रोलर रिले स्केटिंग स्पर्धा (All India Relay Skating championship) गारखेडा स्टेडियम छञपती संभाजी नगर येथे पार पडली. या स्पर्धेत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील खेळाडूं स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सानवी हिने रीले आणि स्पिड अप मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.
सुवर्णकन्या सानवी हिने राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेले यश अभिनंदनीय तर आहेच शिवाय वणीकरांसाठी गौरवांकीत करणारे आहे. सानवी चे वडील माधव शिंदे हे सहाययक पोलीस निरिक्षक म्हणुन वणी येथे कर्तव्यावर आहेत. या यशाचे श्रेय ती आपले प्रशीक्षक, पालक व शिक्षकवृंदाना देत आहे.
Rokhthok News