Home Breaking News शासन नियमाची ऐसीतैसी, दोन वाहनासह पोकलेन मशीनवर कारवाई

शासन नियमाची ऐसीतैसी, दोन वाहनासह पोकलेन मशीनवर कारवाई

● अहेरी- बोरगाव रेती घाटावरील प्रकार

1400

अहेरी- बोरगाव रेती घाटावरील प्रकार

sand mafia news wani : तालुक्यातील अहेरी- बोरगाव रेती घाटातून नियमबाह्य रेतीचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारावर महसूल विभागाने कारवाई केली. यावेळी दोन हायवा ट्रक व एक पोकलेन मशीन ताब्यात घेण्यात आली. ही गंभीर बाब बुधवार दि. 7 जून ला सकाळी 10 वाजता उजागर झाली असून महसूल विभागाने संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास रेती माफियावर आळा बसणार आहे. The state government has taken an ambitious decision to curb sand smuggling and to supply sand to consumers at cheap rates.

Img 20250422 wa0027
c1_20230607_19291135
संग्रहित छायाचित्र

रेती तस्करीवर आळा बसावा व ग्राहकांना स्वस्तदरात रेतीचा पुरवठा व्हावा याकरिता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाच्या अखत्यारीत रेतिघाटाचा लिलाव करून डेपोतून नोंदणीकृत रेती ग्राहकांना रेतीचा पुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले. तर विहित घाटावरून रेतीचे नियमानुसार उत्खनन करून डेपोत साठवणूक करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Img 20250103 Wa0009

रेती घाटातून रेतीचे उत्खनन करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. मजुरांच्या साहयाने रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच डेपोत रेतीची साठवणूक कारावी लागते. त्यानंतर नोंदणीकृत ग्राहकाला नियमानुसार रेतीचा पुरवठा करावा लागतो.

अहेरी- बोरगाव येथील घाटाचा लिलाव करण्यात आला आहे तर ब्राम्हणी येथे रेती डेपोची निश्चिती करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घाटात दोन हायवा ट्रक व पोकलेन मशीन आढळून आल्याने महसूल च्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले त्यांनी तातडीने वाहने व मशीन ताब्यात घेत महसूल विभागाकडे अहवाल सादर केला.

सदर कारवाई महसूल विभागाचे सी.बी.आकुलवार, जयंत झाडे व महेश दलाल यांनी केली. या प्रकरणी त्या घाटाचे लिलावधारक यांचेवर महसूल प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे बघणे औत्सुक्याचे असून नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होताना दिसत आहे.
Rokhthok News