Home Breaking News दणदणीत विजय…खरेदी विक्रीत आमदारांचा ‘वरचष्मा’

दणदणीत विजय…खरेदी विक्रीत आमदारांचा ‘वरचष्मा’

● स‍हकार क्षेञात वाढले प्राबल्‍य ● महाविकास आघाडीचा धुव्वा

3872

स‍हकार क्षेञात वाढले प्राबल्‍य
महाविकास आघाडीचा धुव्वा

Cooperation news wani : वणी खरेदी विक्री संघात जुनेजाणते सहकार क्षेञातील दिग्‍गज रिंगणात उतरले होते. तालुक्‍यातील सहकार क्षेत्र काबीज करण्‍याचा त्‍यांचा मनसुबा माञ बहुतांश निवडणुकीत ध्‍वस्‍त होतांना दिसत आहे. शेतकरी खरेदी विक्री समितीची निवडणुक शुक्रवारी पार पडली यात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व ऍड. देविदास काळे यांचे शेतकरी ए‍कता पॅनलने 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्‍ता मिळवली तर मविआ चा धुव्वा उडवला.A resounding victory… MLAs ‘superiority’ in buying and selling

Img 20250422 wa0027

सहकार क्षेञातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, नुकतेच येथील कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणुक पार पडली. यामध्‍ये आ. बोदकुरवार यांनी एकहाती सत्‍ता मिळवली होती. काही दिवसातच शेतकरी खरेदी विक्री समितीची 17 संचालक पदांकरीता निवडणुक जाहिर करण्‍यात आली होती. आ. बोदकुरवार यांनी सहकार क्षेञातील दिग्‍गज ऍड. देविदास काळे यांचे सोबत मोट बांधली आणि शेतकरी एकता पॅनलच्‍या माध्‍यमातुन मा‍हाविकास आघाडीला आव्‍हान दिले होते.

Img 20250103 Wa0009

खरेदी विक्री समितीच्‍या निवडणुकीत सात हजार 549 मतदारांपैकी तीन हजार 224 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. या निवडणुकीत दोन्‍ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्‍यात आली होती. माञ मतदारांनी आ. बोदकुरवार यांचे गटाला घवघवीत यश मिळवून दिले.

शेतकरी एकता पॅनलचे अभय नामदेव खाडे, राजाभाऊ पाथ्रडकर, नेताजी मोरे, विलास मांडवकर, सुनिल वरारकर, अशोक सुर, विठठल कोडापे, महादेव मत्‍ते, ललीता भोंगळे, रेखा लाडे, विठठल पाचभाई,  विनोद कुचनकार हे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले तर याच गटातील भगवान मत्‍ते व सोनल बोर्डे हे ईश्‍वर चिठीने विजयी झालेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडीला माञ केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले असुन मविआ चे सुधाकर काकडे, अशोक चिकटे व बंडू वांढरे हे विजयी झाले आहेत. एकुनच वणी विधानसभा क्षेञातील सहकार क्षेञात आ. बोदकुरवार यांचा वरचष्‍मा दिसत आहे.
Rokhthok News