Home Breaking News Strong room.. जवळ संशयास्पद वाहन..!

Strong room.. जवळ संशयास्पद वाहन..!

● संजय देरकर आक्रमक, कारवाईची मागणी ● शेकडो समर्थक, कार्यकर्ते पोलीस ठाण्यात धडकले

C1 20241122 08010930
संजय देरकर आक्रमक, कारवाईची मागणी
शेकडो समर्थक, कार्यकर्ते पोलीस ठाण्यात धडकले

Political News | मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासन सज्ज असतानाच Strong room.. जवळ मोबाईल कंपनीचे वाहन संशयास्पद अवस्थेत उभे होते. ही बाब मविआ चे उमेदवार संजय देरकर यांना कळताच त्यांनी त्या वाहनांची तपासणी केली. आक्षेपार्ह साहित्य त्यात दिसल्याने ते वाहन पोलीस ठाण्यात लावले. ते वाहन evm मशीन हॅक करणारे तर नाहीना अशी शंका व्यक्त करत कारवाईची मागणी करण्यात आली. Strong room.. mobile company vehicle standing in suspicious condition nearby

वणी विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. उमेदवारांचे भाग्य evm मध्ये कैद झाले आहे. परंतु मतमोजणी यंत्रात कोणताही फेरबदल होऊ नये याकरिता मविआ चे कार्यकर्ते सतर्क झाले आहे. Strong room च्या आसपास घडणाऱ्या संदिग्ध घटनांवर लक्ष ठेवून आहेत. त्यातच गुरुवारी सायंकाळी 7: 30 वाजताच्या दरम्यान मोबाईल कंपनीचे वाहन संशयास्पदरित्या कार्यकर्त्यांना दिसून आले.

मविआ चे उमेदवार संजय देरकर व कार्यकर्त्यांनी त्या वाहनांची तपासणी केली. त्यात असणारे साहित्य आक्षेपार्ह वाटत असल्याने त्या वाहनाला पोलीस ठाण्यात जमा केले. यावेळी उमेदवार संजय देरकर, अपक्ष उमेदवार संजय खाडे, बसपा उमेदवार अरूणकुमार खैरे, संजय निखाडे, सुधीर थेरे यांचेसह कार्यकर्त्यांनी sdpo गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी यांना त्या मोबाईल कंपनीच्या वाहनांची विस्तृत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

Img 20250103 Wa0009

हा काय प्रकार, तथ्य समोर यावं
त्या संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह साहित्य तर आहेच शिवाय त्याच्याजवळ असणारा वाहतूक परवाना चुकीचा आहे. त्या वाहनाला घुग्गुस ला जायचं होतं तर ते वाहन वणीतील Strong room जवळ का व कशासाठी उभे, असा प्रश्न निर्माण होतो. evm मशीन हॅक करण्याचा तर हा प्रकार नाहीना अशी शंका असून प्रशासनाने त्या वाहनांची तात्काळ चौकशी करावी व गुन्हे दाखल करावेत. हा काय प्रकार, या प्रकरणी तथ्य समोर यावं.
संजय देरकर
उमेदवार, मविआ
Rokhthok News

Previous articleचुरशीच्या लढतीत कोण ठरणार बाजीगर
Next articleसंजय देरकरांची विजयाकडे घोडदौड
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.