Home क्राईम कुख्‍यात व सराईत गुन्हेगारांची ‘धरपकड’

कुख्‍यात व सराईत गुन्हेगारांची ‘धरपकड’

● वणी पोलीस एक्‍शनमोड मध्‍ये ● गोपनिय माहितगार 'सज्‍ज'

वणी पोलीस एक्‍शनमोड मध्‍ये
गोपनिय माहितगार ‘सज्‍ज’

Crime News | वणी पोलीसांच्‍या गोपनिय माहितगारांची ‘टिम’ सतर्क झाल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे. मागील काही दिवसांपासुन ‘वॉटेंड’ गुन्‍हेगारांची होत असलेली धरपकड आणि क्लिष्‍ट गुन्‍हयांतील आरोपी गजाआड करण्‍यात पोलीसांना यश येत आहे. पोलीसांच्‍या हातावर तुरी देवून पसार झालेला ‘गब्‍ब्‍या’ व सराफा व्‍यवसायीकांला फसवणारे दोघे असे तिघे सराईत गुन्‍हेगार गजाआड करण्‍यात आले आहे. The police are succeeding in arresting ‘wanted’ criminals and arresting the accused in complex crimes.

मागील काही कालावधीत पोलीसांची कार्यप्रणाली सुस्तावलेली होती. सराईत फरार गुन्‍हेगारांना शोधण्‍यात पोलीसांना यश येत नव्‍हते. गोपनीय माहितगारांकडून हवीतशी माहिती प्राप्‍त होत नसल्‍याने निष्णात आरोपी गळाला लागत नव्‍हते. काही महिन्‍यांपुर्वी रुजु झालेले ठाणेदार प्रदिप शिरस्‍कर यांनी अधिनस्‍त अधिकारी व कर्मचारी यांना दिशा निर्देश देत ‘हिष्‍ट्रीशिटर’ व पसार आरोपींचा शोध घेण्‍याची मोहिम आरंभताच तीन सराईत गुन्‍हेगार गजाआड झाले आहेत.

‘गब्‍या’ ऊर्फ नावेद मो. कादिर हा वणीतील सराईत चोरटा आहे. त्‍याचे शिरावरे अनेक गुन्‍हे नोंद असुन 7 गुन्ह्यात त्‍याला शिक्षा झालेली आहे. यवतमाळ कारागृहात असतांना त्‍याला आरोग्‍य तपासणीसाठी नेले होते. तपासणीअंती कारागृहात परततांना त्‍याने पोलीसांच्‍या हातावर तुरी देवून पलायन केले होते.

Img 20250103 Wa0009

गब्ब्या तेव्‍हा पासुन तो पसार होता यादरम्‍यान त्‍याने वणीत चोरीचा प्रयत्‍न करतांना एका पञकारावर रॉडच्‍या साहयाने प्राणघातक हल्‍ला चढवला होता. दिड वर्षापासुन पोलीस त्‍याच्‍या मागावर होते माञ त्‍याचा ठावठिकाण लागत नव्‍हता. गोपनिय माहितगारांच्‍या ‘टिप’ वरुन त्‍याला जेरबंद करण्‍यात आले आहे.

वणीतील सराफा व्‍यवसायीक विनोद तुलसीदास खेरा यांचेकडे असलेले वडीलोपार्जित दागीन्याला चांगली किंमत मिळवून देण्‍याचा बहाना करत तब्‍बल 10 लाख रुपयांच्‍या सुवर्णलंकारावर डल्‍ला मारण्‍यात आला होता. आरोपी मागील अकरा महिन्‍यांपासुन फरार होते. पोलीसांना मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्‍या आधारे त्‍या भामटयांना उत्‍तर प्रदेश राज्‍यातुन ताब्‍यात घेण्‍यात आले.

सराफा व्‍यवसायीकांची फसवणुक करणारे अरशद हुसेन उर्फ बबलू उर्फ ऐसउददीन (43) गोपालपुरा पोस्ट दिलोपपुर, जि.प्रतापगढ़ उत्तरप्रदेश तौसीर अहेमद पप्पु अहेमद (30) रा चाहीपुर पोस्ट हरिहरगंज तहसिल, रानीगंज जि प्रतापगढ या दोघांना शिताफीने पोलीसांनी गजाआड केले.

वणी पोलिसांनी काम करण्याची पद्धत बदलल्याचे प्रकर्षाने जाणवते. सराईत गुन्हेगारांचा माग काढण्यात यश आलेले असले तरी लहानसहान गुन्ह्यात होणारी वाढ चिंतनीय आहे. दुचाकी चोरी, टवाळखोर तरुणांचा वाढलेला धुडगूस, रोड रोमिओ व धूम स्टाईल बायकर्स चा उच्छाद यावर आळा घालण्यासाठी पोलिसांना गस्त वाढवावी लागणार आहे.
Rokhthok News