● तहसीलदार यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव
● शेतातून दिलेला रस्ता वैमनस्य निर्माण करणारा..!
Wani News | वणी शिवेतून धाबापूर शिवारात जाण्यासाठी काही शेतकऱ्यांना पूर्वापार ‘रेकॉर्ड’ वर नसताना व पांदण रस्ता असून सुद्धा तालुका न्याय दंडाधिकारी यांनी शेतातून रस्ता दिला. यामुळे अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य न्यायासाठी भटकंती करत आहे. शेतातून दिलेला रस्ता वैमनस्य निर्माण करणारा असून अनुचित प्रकार घडूनये यासाठी महसूल विभागानेच समंजसपणा दाखवून तोडगा काढणे गरजेचे आहे. The road provided through the farm is creating animosity and it is necessary for the revenue department to show reasonableness and find a solution to avoid any untoward incident.

वणी शिवेतून धाबापूर शिवारात अन्य शेतकऱ्यांना जाण्यासाठी दोन शेताच्या धुऱ्यावरून पाच-पाच फुटाचा म्हणजेच दहा फुटाचा बैलबंडी साठी रस्ता तालुका न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार देण्यात आला. शेत शिवाराच्या नकाशावर रस्ता नसताना दिलेल्या आदेशाने व्यथित प्रमोद पावडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
“त्या” शेतकऱ्यांना धाबापूर शिवारातील शेतात जाण्यासाठी वणी ते वागदरा पांदण व वणी ते धाबापूर शिवरस्ता असल्याचे मंडळ अधिकारी यांनी सादर केलेल्या स्थळ निरीक्षण अहवालात नमूद असताना शेतातूनच रस्ता देण्याचे औचित्य काय असा सवाल शेतकरी दाम्पत्यानी उपस्थित केला.
प्रमोद पावडे व शोभा पावडे हे अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य न्याय मिळावा यासाठी भटकंती करताहेत. त्यांचे वणी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतातून देण्यात आलेल्या रस्त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात सुध्दा नुकसान होण्याची शक्यता अधोरेखित केली आहे.
● सत्यता असेल तर न्याय मिळेल ●
कोणत्याही शेतकऱ्याला शेतात ये-जा करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून तालुका दंडाधिकारी यांनी रस्ता देण्याचा निर्णय घेतला असेल. त्या शेतकऱ्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत असेल तर न्यायालय आहेत. सत्यता असेल तर न्याय मिळेलच.
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वणी विधानसभा क्षेत्र