Home Breaking News आणि….त्या… माजी अध्यक्षावर ‘फौजदारी’

आणि….त्या… माजी अध्यक्षावर ‘फौजदारी’

● पतसंस्थेने पोलिसात दिली होती तक्रार

1410

पतसंस्थेने पोलिसात दिली होती तक्रार

Wani News | वणीतील केशवनगरी सहकारी पतसंस्‍था गेल्‍या काही दिवसांपासुन तथ्‍यहिन आरोपात अडकल्‍याचे दिसत आहे. माजी अध्‍यक्षच संस्‍थेविरोधात गरळ ओकायला लागल्‍याने विद्यमान संचालक संस्‍थेसाठी सुरक्षा कवच बनले आहे. पोलीसात दाखल तक्रारीअंती बोगस इंटरेस्‍ट प्रमाणपत्र बनविल्‍याचे उघड झाले आहे. यामुळे संस्‍थेच्‍या माजी अध्‍यक्षावर दिनांक 21 ऑगस्‍टला फौजदारी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. A criminal case has been registered against the former president.

Img 20250422 wa0027

प्रा. महादेव खाडे (72) हे प्रगतीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. ते येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी दिनांक 2 जुलै ला पत्रकार परीषदेच्‍या माध्‍यमातुन संस्थेचे आर्थीक व्यवहार तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांचेवर विवीध आरोप केले होते. संस्थेवर होत असलेल्या निरर्थक आरोपामुळे संचालक मंडळ व्यथित झाले होते.

Img 20250103 Wa0009

केशव नागरी सहकारी पतसंस्‍थेविरोधातील आरोपानंतर संचालकांच्‍या निर्देशावरून मुख्‍यकार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. खाडे यांच्‍या विरोधात विहीत पुराव्‍यानिशी दिनांक 5 जुलै ला पोलीसात तक्रार दाखल केली. त्‍यात बनावट संगणीकृत ‘इंटरेस्ट सर्टिफीकेट’ च्‍या आधारावर संस्‍था तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर खोटे व बिनबुडाचे आरोप केल्‍याचे नमुद करण्यात आले आहे.

केशव नागरी सहकारी पतसंस्‍थेचे माजी अध्‍यक्ष खाडे यांनी  दि. 4 एप्रिल 2022 रोजीच्‍या इंटरेस्‍ट प्रमाणपत्राच्‍या आधारावर संस्‍थेवर गंभीर आरोप केले होते. परंतु ते इंटरेस्‍ट प्रमाणपत्रच आमच्‍या शाखेचे नसल्‍याचे पत्राव्‍दारे एका सोसायटीने केशव नागरी सहकारी पतसंस्‍थेला स्‍पष्‍ट केले आहे. यामुळेच खाडे यांच्‍या अडचणीत वाढ झाल्‍याचे दिसुन येत आहे.

केशव नागरी सहकारी पतसंस्‍थेच्‍या तक्रारीवरून ठाणेदार अजित जाधव यांनी वरीष्‍ठांचे मार्गदर्शन घेत सखोल चौकशी आरंभली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 468, 469, 471, 500, 501 अन्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. प्रकरण क्लिष्ट असल्याने पोलिसांना विस्तृतपणे तपास करावा लागणार आहे. मात्र येनकेन प्रकारे संस्थेची बदनामी करणे माजी अध्यक्षाला भोवले आहे.
Rokhthok News