Home Breaking News चोरडीया यांनी जेष्‍ठ नागरीकांप्रती जपली आपुलकी

चोरडीया यांनी जेष्‍ठ नागरीकांप्रती जपली आपुलकी

● मिठाई, पुष्‍पगुच्‍छ आणि सत्‍कार

701

मिठाई, पुष्‍पगुच्‍छ आणि सत्‍कार

chordiya

Wani News | आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवसांचे औचित्‍य साधुन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दानशुर व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणुन ओळखल्‍या जात असलेल्‍या विजयबाबु चोरडीया यांनी जेष्‍ठांचा सत्‍कार केला. शहरातील वयोवृध्‍द जेष्‍ठ नागरीकांप्रती आपुलकी जपत आंतरराष्‍ट्रीय जेष्‍ठ नागरीक दिन उत्‍साहात साजरा केला. The International Senior Citizens Day was celebrated with enthusiasm, preserving the affection towards the senior citizens.

Img 20250422 wa0027

chordiya 3

दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस “ज्येष्ठ नागरिक दिन”  म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ज्येष्ठांचा सन्मान दररोज, प्रत्येक क्षण आपल्या मनात असावा, परंतु त्यांच्या प्रती आपल्या मनात असलेल्या आदराला व्यक्त करण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांना प्रतिबिंबित करण्यासाठी, औपचारिकरीत्या एक दिवस निश्चित केला गेला आहे.

Img 20250103 Wa0009

chordiya 1

मनोहर कोकनाके, सुभाष खिरटकार, मुन्‍ना भैयाजी तुगनायक, विलास पारखी  या जेष्‍ठ नागरीकांचा यथोचित सन्‍मान करण्‍यात आला. पुष्‍पगुच्‍छ देवून त्‍यांचा आदर सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी बजरंग दल, विश्‍वहिंदु परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्‍याने उपस्थित होते.
Rokhthok News