Home Breaking News त्या….दुर्दैवी घटनेतील तिघांचे मृतदेह मिळाले

त्या….दुर्दैवी घटनेतील तिघांचे मृतदेह मिळाले

● पोहायला गेले आणि अनर्थ घडला ● शहरात पसरली शोककळा

4659

पोहायला गेले आणि अनर्थ घडला
शहरात पसरली शोककळा

Sad News Wani : तालुक्यातील वांजरी परिसरात पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या तिघांचे मृतदेह मिळाले आज रविवार दिनांक 3 सप्टेंबर ला सकाळी मिळाले. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. All the three bodies have been sent to the rural hospital for post-mortem.

आसीम अब्दुल सलाट शेख (16), नुमान शेख सादिर शेख (16) राहणार एकता नगर व प्रतिक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर असे मृतकांची नावे आहेत. अवघे सोळा-सतरा वर्षीय तीन शालेय मित्र एकाच दुचाकीने वांजरी येथे फिरायला गेले होते.

वांजरी परिसरात गौण खनिज उत्खनन केल्यानंतर निर्माण झालेल्या मोठया खड्डयाला तलावाचे स्वरूप आले आहे. पावसामुळे त्यात तुडुंब पाणी साचले होते, तेथे हे तिन्ही मुले दुचाकीने पोहचली. त्यांना पोहण्याचा मोह झाला, आपले कपडे व अन्य साहित्य दुचाकीवर ठेवून पाण्यात उतरले आणि अनर्थ घडले.

मृतक मुले येथील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होते. नवतारुण्यात येत असलेल्या मुलांना सोशल मीडिया चे फार वेड लागले आहे. विविध प्रकारे फोटो शूट करून इन्स्टाग्राम, फेसबुकवर टाकण्यात येते. याकरिता मुले शहराच्या आजूबाजूला रमणीय स्थळांच्या शोधात असते. यामुळेच हे तिन्ही मुले वांजरीला तलावाचे स्वरूप आलेल्या खदानी जवळ गेले. फोटोशूट आणि शूटिंग मुळे तर अघटित घडले नाही ना अशी चर्चा रंगत आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही.

घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली ती मुले कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावल्या जात होते. घटनास्थळी मनसे नेते राजू उंबरकर, समाजवादी पक्षाचे रज्जाक पठाण आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले. रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. रविवारी पहाटे पोलीस कर्मचारी व नगर पालिकेचे भोलेश्वर ताराचंद यांच्या नेतृत्वात शोध घेतला असता तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून काढण्यात आले आहे. घडलेल्या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News

ही बातमी सुद्धा वाचा..

खळबळ…. त्‍या खदानीजवळ तीन तरुणांचे कपडे आढळले