Home Breaking News खळबळ…. त्‍या खदानीजवळ तीन तरुणांचे कपडे आढळले

खळबळ…. त्‍या खदानीजवळ तीन तरुणांचे कपडे आढळले

● घटनास्‍थळावर नागरीकांची प्रचंड गर्दी

5928
C1 20240404 14205351

घटनास्‍थळावर नागरीकांची प्रचंड गर्दी

Wani News | तालुक्‍यातील वांजरी जवळील एका खदानीलगत तीन तरुणांचे कपडे, तीन चप्पलचे जोड, दोन मोबाईल व एक दुचाकी आढळुन आली. काहीतरी विपरीत घडल्‍याची बाब असल्‍याने ग्रामस्‍थांनी मोठी गर्दी केली असुन पोलीसांना पाचारण करण्‍यात आले आहे. Clothes of three youths, three pairs of slippers, two mobile phones and a two-wheeler were found near the quarry.

वांजरी जवळच असलेली एका खदान पाण्याने तुडुंब भरलेली आहे. विरंगुळा म्हणून तरुण तिकडे जात असतात शनिवार दि. 2 सप्टेंबर ला दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास सोळा ते अठरा वर्ष वयाचे तीन तरुण मोपेड दुचाकीने गेले असल्याचे सूत्रांनी सांगीतले आहे. दुचाकी क्रमांक एम एच 29 वाय 5342 ही आढळुन आली तर तीघांचे पॅन्‍ट शर्ट, तीन जोड चप्‍पला आणि दोन मोबाईल नागरीकांच्‍या निदर्शनांस आले.

घडलेली घटना नेमकी काय हे अद्याप स्‍पष्‍ट झालेली नसली तरी काही विपरीत तर घडले नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. वणी पोलीस घटनास्‍थळी रवाना झाले आहे.
Rokhthok News

ही बातमी सुद्धा वाचा…

त्या….दुर्दैवी घटनेतील तिघांचे मृतदेह मिळाले