Home Breaking News धक्‍कादायक, चार रेल्वे कामगारांना विजेचा ‘शॉक’..!

धक्‍कादायक, चार रेल्वे कामगारांना विजेचा ‘शॉक’..!

● जखमीवर करण्यात आले चंद्रपुरात उपचार

2700

जखमीवर करण्यात आले चंद्रपुरात उपचार

Wani News | वरोरा मार्गावरील रेल्‍वेगेट जवळ ओव्‍हरहेड वायरच्‍या मेंटेनन्सचे काम सुरु असतांना चार कामगारांना विजेचा शॉक लागला. यात ते चौघेही कामगार जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही घटना मंगळवारी घडली असुन त्‍यांचेवर वणीत प्राथमीक उपचार न करता गुप्‍तता पाळत चंद्रपुर येथील रुग्‍णांलयात हलविण्‍यात आल्‍याने रेल्‍वे प्रशासनाची अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. Four workers were electrocuted while carrying out maintenance work on an overhead wire.

Img 20250422 wa0027

रेल्‍वे प्रशासन, कर्मचारी तथा कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी घेत नसल्‍याचे मंगळवारी घडलेल्‍या घटनेने उघड झाले आहे. ओव्‍हरहेड वायरच्‍या मेंटेनन्सचे काम करत असतांना विजेचा प्रवाह बंद करणे गरजेचे आहे. रेल्‍वेचे अधिकारी व सुपरवायझर यांनी यावेळी कोणतीही खबरदारी घेतल्‍याचे दिसत नाही.

Img 20250103 Wa0009

चार कामगारांना विजेचा जबर धक्‍का बसला ते खाली कोसळले, या घटनेत ते चौघेही कामगार विजेचा धक्का लागून जखमी झाल्याचे समजते. त्‍यांना तातडीने चंद्रपुर येथील रुग्‍णांलयात पुढील उपचारासाठी हलविण्‍यात आले. त्‍या कामगारांनी सुरक्षा विषयक साहित्य वापरले नसते तर मोठा अनर्थ घडला असता असे बोलल्या जात आहे.

रेल्‍वे प्रशासनाने पाळली गुप्‍तता
घडलेल्‍या घटनेची शहरात कोणतीही वाच्‍यता होवू नये याची पुरेपूर खबरदारी रेल्‍वे प्रशासनाने घेतली आहे. माञ या धक्‍कादायक घटनेत कामगारांच्‍या जीवावर बेतले असते तर ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विज प्रवाह सुरु असतांना मेंटेनन्सचे काम करणे धोकादायक आहे. त्यातच घडलेली घटनाच दडपण्याचे कारस्थान रेल्वेचे अधिकारी किंबहुना संबंधीत सुपरवायझर करताहेत.
ROKHTHOK NEWS