Home Breaking News संजय राठोड शिरपुर पोलीस स्‍टेशनचे नवे ठाणेदार

संजय राठोड शिरपुर पोलीस स्‍टेशनचे नवे ठाणेदार

● करेवाड यांची बदली नियंञण कक्षात

● करेवाड यांची बदली नियंञण कक्षात

Wani News | उप विभागातील अतिशय महत्‍वाचे पोलीस ठाणे म्‍हणुन ओळख असलेल्‍या शिरपुर पोलीस स्‍टेशनचे नवे ठाणेदार म्‍हणुन सपोनि संजय भिल्लू राठोड रुजु झाले आहेत. मावळते ठाणेदार गजानन करेवाड यांची नियंञण कक्षात बदली करण्‍यात आली आहे. API Sanjay Bhillu Rathod has joined as the new PSO of Shirpur Police Station.

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विहीत मुदत पुर्ण झालेल्‍या अधिकाऱ्यांच्या बदल्‍या करण्‍याच्‍या सुचना निवडणुक आयोगाच्‍या निर्देशान्‍वये पोलीस प्रशासनाने निर्गमीत केल्‍या होत्‍या. दहा ऑक्‍टोबर पर्यंत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची लोकसभा क्षेञातील कर्तव्‍याची मुदत पुर्ण झाली असेल अशांची यादी करण्‍याचे सुचविण्‍यात आले होते. त्‍यानुसार पोलीस विभागाने हालचाली करण्‍यास सुरुवात केली आहे.

यवतमाळ शहर पोलीस ठाण्‍यात सहाय्यक पोलीस निरिक्षक म्‍हणुन कर्तव्‍य बजावणारे संजय भिल्‍लु राठोड यांना शिरपुर पोलीस स्‍टेशनचे प्रभारी ठाणेदार पदाची लॉटरी लागली आहे. अतिशय महत्‍वाचे आणि हेवीवेट ठाणे म्‍हणुन शिरपुरची ओळख आहे. अनेक अधिकारी शिरपुरला प्रभार मिळावा याकरीता देव पाण्‍यात ठेवून असतात.

Img 20250103 Wa0009

सपोनि गजानन करेवाड यांनी शिरपूर ठाण्याचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने हाताळला. तपास यंत्रणा कार्यक्षम ठेवत गुन्हे आटोक्यात आणले. त्या प्रमाणेच घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले. हत्या, चोरी आणि अन्य गुन्ह्यातील आरोपींना शिताफीने ताब्यात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
Rokhthok News