Home Breaking News भीषण…बसने दुचाकीला उडविले, महीला ठार

भीषण…बसने दुचाकीला उडविले, महीला ठार

● वणी - वरोरा मार्गावरील घटना

6282
C1 20240131 17484123

वणी – वरोरा मार्गावरील घटना

Accident News : राज्‍यमार्ग परीवहन विभागाच्‍या बसने वणी- वरोरा मार्गावरील झोला शिवारात दुचाकीला भिषण धडक दिली. यात एका 40 वर्षीय महीलेचा घटनास्‍थळीच मृत्‍यु झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी 4.30 वाजताच्‍या सुमारास घडली. A bus collided with a two-wheeler on the Vani-Varora route.

Img 20250601 wa0036

वणी वरून चंद्रपुरला जाणारी बस क्रमांक MH -14 -HS- 8227 ही भरधाव वेगाने जात असतांना वरोरा मार्गावरील झोला परीसरात दुचाकी क्रमांक MH-34 CE- 3120 या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचकीवरील महिला बसच्या चाकाखाली आली तर बस चक्क दुभाजकावर चढली. या घटनेत 40 वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्‍यु झाला.

Img 20250103 Wa0009

अपघात घडताच प्रत्‍यक्षदर्शींनी तातडीने पोलीसांना सुचित केले. वाहतुक शाखेच्या सपोनि सिता वाघमारे आपल्‍या पथकासह घटनास्‍थळी पोहचल्‍या. त्‍यांनी मृतक महीलेच्‍या जखमी पतीला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. घटनास्‍थळी पंचनामा करून मृतदेह उत्‍तरीय तपासणीकरीता ग्रामिण रूग्‍णालयात हलविण्‍यात आला आहे.
Rokhthok News