● सिनेतारका इशा केसकर वाढवणार रंगत
Wani News | नवराञोत्सवात गरबा दांडीयाच्या माध्यमातुन तरुण तरुणींचा उत्साह व्दिगुणित व्हावा याकरीता मागील दोन वर्षापासुन मनसे नेते राजु उंबरकर हे मनसे गरबा महोत्सवाचे आयोजन कारताहेत. यावर्षी जय मल्हार फेम “बानू” प्रसिध्द सिनेतारका इशा केसकर (Isha Keskar) महोत्सवाची रंगत वाढवणार आहे. Jai Malhar fame “Banu” actress Isha Keskar to attend MNS Garba Mahotsav

“मनसे गरबा महोत्सवास” शहरातील तरुण तरुणी व महिलांची मोठ्या प्रमाणात हजेरी असून प्रेक्षकांचा सुद्धा तुफान प्रतिसाद मिळत आहे. लयबद्ध संगिताच्या तालावर तरुण-तरुणी बेधुदपणे गरबा नृत्यांत सहभागी होताहेत. गरबानृत्य बघण्यासाठी राम शेवाळकर परिसरातील मनसे गरबा महोत्सवात प्रचंड गर्दी उसळत आहे.
नवराञोत्सवात दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या कडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नुकत्याच मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी जमलेल्या गर्दीने यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांचा उच्चांक मोडला होता.
नवराञोस्तवात आयोजित केलेल्या गरबा महोत्सवामध्ये जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसह नुकताच प्रदर्शित झालेला “सरला एक कोटी” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली इशा केसकर रविवार दिनांक 22 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता हजेरी लावणार आहे. यामुळे मनसेच्या गरबा महोत्सवाची रंगत वाढणार हे निश्चित.
Rokhthok News