Home क्राईम Crime : हायवा ट्रक चोरीचा छडा अवघ्‍या 24 तासात

Crime : हायवा ट्रक चोरीचा छडा अवघ्‍या 24 तासात

● LCB व स्‍थानिक पोलीसांची संयुक्‍त कारवाई ● 37 लाखाचा मुददेमाल हस्‍तगत

1124
C1 20231029 14394581

LCB व स्‍थानिक पोलीसांची संयुक्‍त कारवाई
37 लाखाचा मुददेमाल हस्‍तगत

Crime News Wani | वणी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतून दोन हायवा ट्रक चोरीला गेल्‍याची घटना दिनांक 27 ऑक्‍टोबरला मध्यरात्री घडली. याप्रकरणी वणी पोलीसात रितसर तक्रार दाखल करण्‍यात आली होती. तांञीक बाबींचा अवलंब करत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (LCB) व स्‍थानिक पोलीसांनी संयुक्‍तरित्‍या तपास करुन अवघ्या 24 तासात तीन आरोपींच्‍या मुसक्‍या आवळल्‍या तर 37 लाखाचा मुददेमाल हस्‍तगत केला आहे.Three accused have been detained and 37 lakhs worth has been seized.

मो. शगीर मो जाबीर अन्सारी रा. गुलमोहर पार्क यवतमाळ, कुंदन ओमप्रकाश तिजारे (28) रा. हनुमान नगर, कन्‍हान नागपुर व निकेश नामदेव वासनीक (23) रा. आंबेडकर चौक कन्‍हान नागपुर यांना पोलीसांनी ताब्‍यात घेतले आहे. हायवा ट्रक चोरीच्‍या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्‍हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्‍सोड यांनी तातडीने तपास यंञणा कार्यान्वित करण्‍याच्‍या सुचना पोलीस प्रशासनाला दिल्‍या होत्‍या.

वणी वरोरा मार्गावरील लॉर्डस बिअर बार समोरील जागेवर हायवा ट्रक क्रमांक MH-34-BG-9452 व MH-34-BG-1212 उभे करण्‍यात आले होते. दिनांक 27 ऑक्‍टोबरला मध्‍यराञी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी लंपास केले. याप्रकरणी हायवा ट्रक मालक समीर परवेज रफीक रंगरेज यांच्‍या पत्‍नी सो. तसलीम समीर रंगरेज रा. एकतानगर वणी यांनी पोलीसांत तक्रार नोंदवली होती.

ट्रक चोरी प्रकरणी स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पथक व स्‍थानिक पोलीसांनी तपास यंञणा कार्यान्वित केली. वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आणि गोपनिय बातमीदारांना सतर्क करत तांञीक बाबी तपासण्‍यात आल्‍या. दिनांक 28 ऑक्‍टोबरला पहाटे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपनिय बातमीदारांने चोरी गेलेली वाहने ही यवतमाळ येथील आर्णी रोड बायपास लगत असलेल्या धरमकाटया जवळील मोकळया जागेत ठेवून असल्‍याची विश्वसनीय माहिती दिली.

पोलिसांनी गुलमोहर पार्क येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या  मो. शगीर मो जाबीर अन्सारी याला ताब्‍यात घेत कसुन विचारणा केली असता त्याचेकडे कामाला असलेले कुंदन व निकेश याचे मदतीने चोरल्‍याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपींना ताब्‍यात घेतले असुन गुन्ह्यात वापरण्‍यात आलेल्‍या SUV कारसह दोन्‍ही हायवा ट्रक ताब्‍यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक  LCB आधासिंग सोनोने,  ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात API अतुल मोहनकर, API अमोल मुडे,  सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, नरेश राउत, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच पो.स्टे. वणी येथील API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, इकबाल शेख,  पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसीम शेख,  गजानन गेडाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ROKHTHOK NEWS