Home Breaking News काय…भाजपा नगरसेवकाला ठाणेदाराने बदडले…!

काय…भाजपा नगरसेवकाला ठाणेदाराने बदडले…!

● 7 तास पोलीस ठाण्यात आमदारांचा ठिय्या ● CCTV फुटेज ठरवणार ठणेदाराचे भवितव्य

5476
C1 20231028 23460395

7 तास पोलीस ठाण्यात आमदारांचा ठिय्या
CCTV फुटेज ठरवणार ठणेदाराचे भवितव्य

Police News | मारेगाव येथील ठाणेदाराने चक्क भाजपा नागरसेवकालाच ठाण्यात बोलावून जबर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी शनिवार दिनांक 28 ऑक्टोबरला भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर व भाजपा कार्यकर्त्यांनी सात तास पोलीस ठाण्यात ठिय्या देत ठाणेदारावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे CCTV फुटेज ठणेदाराचे भवितव्य ठरवणार आहेत. They stayed at the police station for seven hours and demanded action against the Thanedar.

Img 20250619 wa0016

पोलीस ठाण्याचा अधिकारी झाल्यावर ठाणेदार स्वतःला मालक समजायला लागतो. त्याला सन उत्सवाचे भान राहत नाही याचा प्रत्यय मारेगाव पोलीस ठाण्यात आला. मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 16 मधील सार्वजनिक दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात येत असताना पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार विहीत वेळ संपल्याचे आदेश तोंडी स्वरूपात देण्यात आले. मात्र याप्रसंगी थोडा अवधी मिळावा याकरिता मंडळाने आर्जव केले होते. त्यातच नगरसेवक राहुल राठोड याने पोलीस कर्मचाऱ्यां सोबत हुज्जत घातल्याचे बोलल्या जाते.

Img 20250103 Wa0009

ठाणेदार जनार्दन खंडेराव ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते त्यांनी त्या नगरसेवकाला पोलीस ठाण्यात बोलावले व जबर मारहाण केली, मानेवर मारण्यात आल्याचा आरोप नगरसेवकाने केला. तसेच ठाणेदार खंडेराव यांनी त्यावेळी राठोड याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली असे बोलण्यात येत होते.

नगरसेवक राठोड यांनी रात्री उशिरा घडलेली आपबीती आमदार व भाजपा पदाधिकाऱ्यांना सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी भाजपचे नेते व कार्यकर्ते मारेगाव ठाण्यात जमले. वातावरण तापायला लागले, मात्र ठाणेदार यवतमाळ येथे बैठकीला गेले होते. तब्बल सात तास आमदार बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष बोर्डे, लोकसभा विस्तारक बेलूरकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्यावर कारवाईची मागणी रेटून धरली.

सन उत्सवाच्या काळात ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम असतं त्यांनीच कायदा हाती घ्यावा हे मारेगाव येथील नागरिकांना पटलेलं नाही. “अवैद्य व्यावसायिकांना मोकळं रान आणि सर्वसामान्यांना दंडुके शाहीचा मान” हे घातक आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने समिती नेमली आहे. चार दिवसात विस्तृत चौकशी करून निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणी CCTV फुटेज ठाणेदार खंडेराव यांचं पुढील भवितव्य ठरवणार आहे.
Rokhthok News

Previous articleAccident : ऑटोचा अपघात, विद्यार्थी ठार
Next articleCrime : हायवा ट्रक चोरीचा छडा अवघ्‍या 24 तासात
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.