Home वणी परिसर तालुक्यातील कृषी केंद्र तीन दिवस बंद

तालुक्यातील कृषी केंद्र तीन दिवस बंद

● SDO याना निवेदन सादर

1035
C1 20231101 08585891

SDO याना निवेदन सादर

Wani news : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या पाच विधेयकामुळे, या नवीन कायद्यामुळे राज्य शासनाने विक्रेत्यांना विक्री व्यवसाय करणे अशक्य असल्याने नवीन पाच विधेयकाच्या निषेधार्थ दोन नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर या तीन दिवसांत वणी तालुक्यातील सर्व कृषी केंद्र बंद राहतील, असे निवेदन येथील कृषी साहित्य विक्रेता संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले आहे. All agricultural centers in Wani taluka will remain closed for three days

महाराष्ट्र शासनाने प्रस्ताविक विधेयक क्रमांक 40, 41, 42, 43 व 44 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रचलित असलेले कायदे पुरेशी असतानाही राज्य शासनाकडून नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रीसाठी अत्यंत घातक आहेत व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अशक्य होणार आहे. राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाही. कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा या सीलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री करीत असल्याने व कृषी विभाग मान्यता प्राप्त सिलबंद व पॅकमधील निविष्ठांचे दर्जाबाबत व इतर बाबीबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे योग्य निविष्ठा विकणारे कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर जरब बसविण्यासाठी अन्यायकारी कायदे विक्रेत्यावर लादू नये, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी वणी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय गारघाटे, उपाध्यक्ष सागर धवणे, सचिव देवराव काकडे, प्रशांत पाचभाई सह तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालक उपस्थित होते.
Rokhthok News