● अनियंञीत दुचाकी पोलवर धडकली
Accident News Wani : दुचाकी असो अथवा अन्य कोणतेही वाहन सुसाट चालविण्याचा छंद अनेकांना जडला आहे. भरधाव दुचाकी वरोरा मार्गावरील गुंजच्या मारोतीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवर धडकली. यात 34 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपुरला हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. A 34-year-old youth was seriously injured and has been shifted to Chandrapur for further treatment.

गजू आत्राम (34) असे जखमी तरुणांचे नांव आहे. तो तालुक्यातील कायर येथील निवासी आहे. चंद्रपुर जिल्हयातील भद्रावती तालुक्यात असलेल्या सासुरवाडीला आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 -BZ-7222 ने जाण्यासाठी निघालेला असतांना वणी जवळ हा भिषण अपघात झाला.
गुंजच्या मारोती परिसरात अपघात होताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. त्याचे डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी त्याला येथील ग्रामीण रुग्णांलयात उपचारासाठी हलवले. डॉक्टरांनी तपासणी केली असता डोक्याला जबर मार असल्याने त्याला पुढील उपचाराकरीता चंद्रपुरला रवाना केले आहे.
Rokhthok News