● जन्नत एलेव्हन ठरला अव्वल
● रनरअप एलेव्हन टायगर रोरिंग
Wani News : पारसमल प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तुत ऍड. कुणाल चोरडिया यांचे अध्यक्षतेखाली T-10 चॅम्पियन्स लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन दिनांक 2 जानेवारी पासुन करण्यात आले होते. अंतीम सामना शनिवार दिनांक 13 जानेवारीला सायंकाळी होता. यावेळी जन्नत इलेव्हन व इलेव्हन टायगर रोरिंग या दोन संघात चुरशीचा सामना झाला. यात जन्नत एलेव्हन संघाने थरारकरित्या बाजी मारली. प्रेक्षकांना माञ T10 चॅम्पियन्स लीगच्या अंतीम सामन्यात IPL चा फिल आला. Jannat XI and XI Tiger Roaring had a tough match.

इलेवन टायगर रोरिंग संघाने नाणे फेक जिंकले व कर्णधार रवी राजूरकर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात इलेव्हन टायगर रोरिंगची सुरवात निराशाजनक झाली. 5 षटकात 4 गडी बाद होऊन अवघे 35 धावा काढण्यात आल्या. कर्णधार रवी राजूरकर फलंदाजीला आला आणि त्याने फटक्यांची आतिषबाजी केली. अवघ्या 25 चेंडूत त्याने 59 धावा काढल्या. त्यामुळे इलेव्हन टायगर रोरिंग ला 10 षटकात 7 गडी बाद 98 धवाचा डोंगर उभा करिता आला.
जन्नत एलव्हान संघ मैदानात उतरला, 98 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्याच षटका पासून त्यांनी आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या पाच षटकात 50 रन केले. सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता मात्र रवी राजूरकर व केतन डंभारे यांच्या भेदक गोलंदाजीने सामन्यात चुरस वाढली. सामना रंगतदार वळणावर आला कोण बाजी मारणार हे कळत नव्हते.
जन्नत इलेव्हन संघातील रणजित याने 13 चेंडूत 27 धावा तर प्रतीक मत्ते याने 11 चेंडूत 16 धावा करून संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र प्रतीक बाद होताच सामन्यात अजून चुरस वाढली शेवटच्या षटकात 13 धावाची गरज असताना रवी जुनगरी याने आक्रमक फलंदाजी करत 6 चेंडूत 20 धावा केल्या. शेवटच्या षटकात दोन षटकार ठोकून विजय मिळवून दिला.
प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तुत ऍड. कुणाल चोरडिया यांचे अध्यक्षतेखाली T-10 चॅम्पियन्स लीग क्रिकेट सामन्याचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात प्रमुख अतिथी म्हणुन माजी केंद्रीय गृहराज्य मंञी हंसराज अहिर, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, संजय खाडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, विजय चोरडिया यांची उपस्थिती होती. आयोजित T-10 चॅम्पियन्स लीग क्रिकेट यामन्यात मॅन ऑफ द सिरिज चा मानकरी रवी राजुरकर ठरला असुन त्याला स्पोर्ट्स बाईक भेट देण्यात आली.
Rokhthok News






