● डोकेदुखी ठरले कारण
Sad News : येथील विठठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या विस वर्षीय तरूणीचा अकस्मात मृत्यू झाला. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान अचानक तिचे डोके दुखायला लागले आणि दवाखान्यात पोहचत नाही तोवर तिची प्राणज्योत मालवली. Twenty year old young girl died suddenly.

चंद्रपुर जिल्हयातील आमडी या गावातील निवासी असलेली तरुणी येथील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या मावशी कडे राहुन शिक्षण घेत होती. ती आजारी असल्याची पुसटशीही कल्पना घरच्या मंडळीना आली नाही. ती नेहमीप्रमाणे शुक्रवारी शिकवणीवर्ग आटोपुन घरी आली. राञी उशीरा तिचे डोके दुखायला लागले.
नातेवाईक मंडळीनी राञी 3 वाजताच्या सुमारास तिला येथील खाजगी रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषीत केले. मृतकाला उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णांलयात हलविण्यात आले असुन. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील तपास वणी पोलीस करताहेत.
Rokhthok News