● सोमवारी सकाळी होणार अंत्यसंस्कार
Sad News wani : येथील जेष्ठ पत्रकार राजू धावंजेवार यांच्या सुविद्य पत्नी ज्योती धावंजेवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मृत्यूसमयी त्या 57 वर्षाच्या होत्या. Jyoti Dhavanjewar passed away due to a short illness.

पत्रकार व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या अर्धांगिनी ज्योती राजू धावंजेवार (57) ह्या हसतमुख स्वभावाच्या होत्या. त्यांचे निधनाने धावंजेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचेवर दिनांक 29 जानेवारीला सकाळी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचे पश्चात्य पती, मुलगा, मुलगी व नातवंड असा आप्तपरिवार आहे. (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)