Home Breaking News ग्रामपंचायत सदस्यांला माजी सरपंचांनी बदडले

ग्रामपंचायत सदस्यांला माजी सरपंचांनी बदडले

● पंचायत समिती समोरच घडला प्रकार ● परस्परविरोधी पोलिसात तक्रार

2866
C1 20240126 10200196

पंचायत समिती समोरच घडला प्रकार
परस्परविरोधी पोलिसात तक्रार

Wani News : विरकुंड गट ग्राम पंचायतीच्या माजी महिला सरपंचाने विद्यमान ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. ही घटना दिनांक 25 जानेवारीला दुपारी पंचायत समितीच्या अगदी समोर घडल्याने गावगाड्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. A former woman sarpanch of a gram panchayat beat up a sitting gram panchayat member.

Img 20250601 wa0036

गावगाड्यातील राजकारण पार बदलून गेले आहे. शासकीय योजनाचा लाभ आपल्याच जवळच्याना मिळावा याकरिता सत्ताधारी सदस्य गटबाजी करत असल्याचे वास्तव या घटनेने उजागर होत आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या घरकुल यादीत सत्ताधाऱ्यांनी फेरबदल केल्याचा आरोप करत माजी सरपंच कविता अंबादास सोयाम यांनी तक्रार केली होती.

Img 20250103 Wa0009

तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी सरपंच, सदस्य व सचिव यांची बैठक आयोजित केली होती. या सुनावणी दरम्यान तक्रारकर्त्या माजी सरपंच कविता सोयाम सुद्धा उपस्थित होत्या. सुनावणी झाल्यानंतर पंचायत समिती समोर माजी सरपंच कविता सोयाम व सदस्य अमोल पारखी यांच्यात वाद झाला.

ग्रामपंचायत सदस्य पारखी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. तर माजी सरपंच सोयाम यांनी दिलेल्या तक्रारीत घस्कुलचे यादीवरून वाद उपस्थित करून धक्काबुक्की केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सरपंच पदावर असताना अमोल पारखी यांचा माझेकडे पाहण्याचा दष्टीकोन वेगळाच होता असा गंभीर आरोप केला आहे.
Rokhthok News