Home Breaking News राळेगांव व पुसद मध्‍ये धडाडणार ठाकरेंची “तोफ”

राळेगांव व पुसद मध्‍ये धडाडणार ठाकरेंची “तोफ”

● यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भगवं वादळ

866
C1 20240312 12041359

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भगवं वादळ

Political News | लोकसभेची रणधुमाळी अवघ्‍या काही दिवसात सुरु होणार आहे. युती व महाविकास आघाडी उमेदवारांची चाचपणी करताहेत. तर यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाकडून माजी राज्‍यमंञी संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित समजल्‍या जात आहे. जनसंवाद याञेच्‍या निमित्‍ताने पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांची तोफ राळेगांव व पुसद येथे धडाडणार आहे. The candidat of Sanjay Deshmukh from Shiv Sena UBT group is confirmed

Img 20250422 wa0027

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात युती कडून उमेदवारी बाबत तिढा कायम आहे. पंचवीस वर्ष खासदारकी उपभोगणाऱ्या भावना गवळी यांनी युतीकडून उमेदवारी मिळावी याकरीता “फिल्‍डींग” लावली आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला जागा सुटणार की नाही याबाबत साशंकता आहे. भाजपा आपला उमेदवार उतरविण्‍यास इच्‍छूक असल्‍याने संभाव्‍य उमेदवार कोण असेल हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

Img 20250103 Wa0009

जनसंवाद याञेच्‍या निमित्‍ताने उध्‍दव ठाकरे संपुर्ण राज्‍यात विरोधकांच्‍या रणनितीची चिरफाड करतांना दिसत आहे. राळेगांव व पुसद मध्‍येसुध्‍दा खासदार भावना गवळींना लक्ष करण्‍यात येईल असे दिसत आहे. तर आ. संजय राठोड यांचेवर सुध्‍दा निशाना साधणार का हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे.

उध्‍दव ठाकरे यांच्‍या निवडणुकपुर्व दौऱ्याने शिवसेना उबाठा गटात उत्‍साह संचारतांना दिसत आहे तर एकनिष्‍ठ शिवसैनिक एकवटले आहेत. पक्षातील खोगीरभर्ती दुर सारल्‍यागेल्‍यामुळे जुना जाणता व सच्‍चा शिवसैनिक पुन्‍हा जोमाने निवडणुक रणांगणात उतरतांना दिसत आहे. एकुनच राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
Rokhthok News