● शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी
Political News | चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभेच्या सार्वञीक निवडणुकी करीता भारतीय जनता पक्षाने तडफदार लोकप्रतिनिधी, मंञी सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्या यादीतच उमेदवारी जाहिर केली. उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह संचारला आहे. गुरुवारी दुपारी येथील शिवतिर्थावर फटाक्याची आतिषबाजी व एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. Sudhir Mungantiwar was announced as a candidate in the first list itself.
चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने “इलेक्टीव्ह मेरीट” उमेदवारांची निवड केली आहे. संसदेत जाणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी प्रथमतः स्पष्ट केलेले होते माञ पक्ष आदेशाचे पालन करु असे मत सुध्दा त्यांनी व्यक्त केले होते. मुनगंटीवार यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. याकरीताच आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांचे नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आयोजीत आनंदोत्सवात बोलतांना आ. बोदकुरवार यांनी विजयी पताका फडकवणारच असे अभिवचन दिले तर विकासाचा महामेरू असलेले मुनगंटीवार केंद्राच्या अधिनस्त असलेले वेकोलीचे प्रश्न, रेल्वे सायडींग, रॅक पॉंईट या रखडलेल्या महत्वपुर्ण प्रश्नांना मार्गी लावतील असा अशावाद व्यक्त केला.
याप्रसंगी लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, गजानन विधाते, चंद्रकांत फेरवाणी, संतोष डंभारे, अभिनव भास्करवार, शुभम गोरे, आशिष डंभारे व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Rokhthok News