● GRN-SIDEX कंपनीवर धडकणार शिवसैनिक
Wani News | प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने GRN व SIDEX कंपनीवर जोरदार हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन दिनांक 12 मे रोजी कंपनीच्या निलजई- बेलोरा येथील कार्यालयासमोर होणार आहे. Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) strongly attacks GRN and SIDEX companies on behalf of the party
“रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा” या टॅगलाईनचा वापर करत करत एल्गार पुकारण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आ. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात “हल्लाबोल” आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

न्याय व रोजगाराच्या हक्कासाठी होणाऱ्या या आंदोलनात सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार तरुण व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख निखाडे यांनी केले आहे.
Rokhthok News






