Home Breaking News आलिशान वाहनांची धडक, महिला ठार

आलिशान वाहनांची धडक, महिला ठार

● उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू

C1 20240715 16564682

उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू

Sad News | रस्त्याच्या कडेला काम करत असताना 50 वर्षीय महिलेला भरधाव आलिशान वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ नागपूरला नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कायर मार्गावरील पेटूर शिवारात रविवार दिनांक 14 जुलैला सायंकाळी घडली. The woman was hit by a speeding luxury vehicle.

आशा जनार्दन नांदे (50) असे मृतक महिलेचे नाव आहे, ती तालुक्यातील पेटूर येथील निवासी होती. घटनेच्या दिवशी ती रस्त्याच्या कडेला काम करत होती. त्याचवेळी भरधाव आलेल्या आलिशान कार क्रमांक MH 31 EA 8229 ने महिलेला मागून जबर धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली ग्रामस्थांनी तिला वणीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

पुढील उपचारासाठी नागपूर येथे जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. यामुळे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात परत आणण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर शव नातेवाईकांना सोपविण्यात आले. याप्रकरणी मृतकाच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली असता वाहन चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009