Home Breaking News प्रशांत माधमशेट्टीवार यांना पितृशोक

प्रशांत माधमशेट्टीवार यांना पितृशोक

● काकांच्या इच्छेनुसार करणार देहदान

440
C1 20240716 21543643

काकांच्या इच्छेनुसार करणार देहदान

Sad News | यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक प्रशांत माधमशेट्टीवार यांचे वडिल अरुण काका मादमशेट्टीवार यांचे आज दिनांक 16 जुलै ला सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 83 वर्षाचे होते, त्यांच्या इच्छेनुसार देहदनाचा निर्णय परिवाराने घेतला असून उद्या बुधवारी सकाळी 7 ते 11 त्यांचे अंत्यदर्शन करता येणार आहे. Arun Kaka Madamshettywar sadly passed away today on 16th July in the evening due to old age.

Img 20250601 wa0036

प्रा. अरूण माधमशेट्टीवार हे लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते जैताई मंदिराचे विश्वस्त म्हणून काम करीत होते. अतिशय मनमिळाऊ व हसतमुख असल्याने त्याचा प्रचंड लोकसंग्रह होता. अल्पशा आजाराने त्यांचे चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांचे देहदान करण्यात येणार असल्याचे पारिवारिक मंडळींनी स्पष्ट केले आहे.

Img 20250103 Wa0009
 (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )