Home Breaking News धक्कादायक…इमारतीवरून पडून इसमाचा मृत्यू

धक्कादायक…इमारतीवरून पडून इसमाचा मृत्यू

● रंगरंगोटी करताना गेला तोल

C1 20240726 07265990

रंगरंगोटी करताना गेला तोल

Sad News | छोरिया ले आऊट मधील एका इमारतीची रंगरंगोटी सुरू होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास रंगकाम करत असताना 50 वर्षीय कामगार इसमाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 25 जुलै ला घडली. 50-year-old laborer, lost his balance while painting and fell down.

बंडू तुकाराम खोब्रागडे (50) असे मृतकाचे नाव आहे ते रंगारीपुरा येथे वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी ते रंगकाम करायला छोरिया ले आऊट परिसरातील विनायक अपार्टमेंट मध्ये गेले होते. तिसऱ्या मजल्यावरील रंगरंगोटी करत असताना त्यांचा तोल गेला व ते खाली कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

घडलेल्या घटनेबाबत त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना व घरच्या मंडळींना कळवले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतक बंडू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009