● परस्पर विरोधी तक्रार, गुन्हे दाखल
Crime News : शिंदोला येथील रहिवासी आणि WCL HICO माईन्समध्ये कार्यरत युवा नेता आयुष रोहिदास ठाकरे (26) यांचेवर जुन्या वादातून चौघांनी हल्ला चढवला. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार नोंदविण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. A conflicting complaint was filed at Shirpur police station.
या प्रकरणी चंदु उर्फ प्रविण आनंदराव पिंपळकर (40) रा. माथोली (कोलगाव), सुशिल शाहुल रॉबर्ट (20) रा. घुग्गुस, चिरंजीव कन्हेय्या मेडसेल्ली (39) रा.गांधीनगर घुग्गुस, सलमान ईकबाल पठाण (32) रा. शिंदोला असे गुन्हा नोंद करून ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 19 मे रोजी रात्री 9.25 वाजताच्या सुमारास आरोपी चंदु पिंपळकर याने फोन करून ठाकरे यांना धमकी दिली. तर तीन साथीदारांसह 10.30 वाजताच्या सुमारास ठाकरे यांचे घर गाठले. घराचे गेट जबरदस्तीने तोडून अंगणात प्रवेश केला आणि आयुष ठाकरे यांना थापडाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेदरम्यान मधे पडलेली ठाकरे यांची आई हिला देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे पूर्वाश्रमीचे वाद उफाळून येत असून ठाणेदार माधव शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच परस्पर विरोधी तक्रारीअंती गुन्हे नोंद करून तपास आरंभला आहे.
Rokhthok News






