Home Breaking News उंबरकरांनी जपली परंपरा, रक्षाबंधन पवित्र नात्याचा ऋणानुबंध.!

उंबरकरांनी जपली परंपरा, रक्षाबंधन पवित्र नात्याचा ऋणानुबंध.!

● वणीत रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन

C1 20240819 19111427

वणीत रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन

MNS NEWS | रक्षाबंधन पवित्र सणाच्या निमित्ताने वणी विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनी गेल्या अनेक वर्षापासून न चुकता रक्षा बंधन सोहळ्याचे आयोजन करतात. यावर्षी देखील येथील वसंत जिनींग हॉल मध्ये सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांना राखी बांधून आशीर्वाद दिले. Women blessed MNS party leader Raju Umbarkar by tying rakhi.

C1 20240819 19114203

रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला पवित्र सण. मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते. बहिण भावाच्या नात्यातील हा गोडवा असाच कायम राहील असे उंबरकर यांनी स्पष्ट केले.

C1 20240819 19120652

महिलांनी आपल्या बांधिलकीचे प्रतीक म्हणून राख्या बांधून त्यांच्याप्रती प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक दाखवले. उंबरकर यांनी या उत्सवाचा महत्त्वाचा संदेश महिलांच्या सन्मान आणि त्यांच्या हक्कांवर भर देण्यासाठी वापरला. रक्षाबंधन या सणाने केवळ भाऊ-बहिणींच्या नात्यातील बंधनांना नव्हे, तर समाजातील महिलांच्या अधिकार आणि सन्मानाच्या जाणीवेला देखील उजाळा दिला.

Img 20250103 Wa0009

रक्षाबंधनाचा हा सण केवळ भाऊ-बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक नसून, समाजात महिलांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती आदर दर्शविणारा एक अनोखा दिवस आहे. उंबरकर यांनी यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधला साधला आणि रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने मी तुमचा भाऊ म्हणून कायमच तुमच्या सोबत असेल असा शब्द दिला.

“महिलांचा आशीर्वाद आणि पाठिंबा नेहमीच माझ्या कार्यासाठी महत्त्वाचा राहिला आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मला नवीन उर्जा आणि आत्मविश्वास मिळतो असे उंबरकर यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांची मते जाणून घेतली आणि भविष्यात त्यांच्या सशक्तीकरणासाठी अधिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला.
Rokhthok News